Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Friday, July 26, 2019

*शालेय पोषण आहार योजनेअंतर्गत महत्वाची सूचना*

*MDM App चे रजिस्ट्रेशन करताना OTP Sending Fail असा repIy येत असल्यास SARAL MDM PortaI च्या शाळा लॉगिनवरून खालीलप्रमाणे कार्यवाही करावी.*

👉 प्रथम संगणकाचा वापर करून www.education.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा.
👉 वेबसाईट ओपन झाल्यावर मध्यान्ह भोजन योजना या टॅबवर क्लिक करा.
👉 यानंतर MDM Portal वर क्लिक करा.
👉 आपल्या शाळेचा यु-डायस क्रमांक व MDM चा शाळेचा पासवर्ड टाकून अकाऊंट लॉगिन करा.
👉 होमपेज ओपन झाल्यानंतर App Setting > अॅप अनुप्रयोग या टॅबवर क्लिक करा.
👉 यानंतर आपल्या शाळेचे रजिस्टर्ड असलेले सर्व मोबाईल क्रमांक आपल्याला स्क्रिनवर दिसतील.
👉 यामध्ये आपल्या ज्या मोबाईल क्रमांकाला अॅप रजिस्ट्रेशन करताना OTP Sending FaiI असा मेसेज येत आहे तो मोबाईल क्रमांक शोधा व फक्त त्याच मोबाईल क्रमांकाच्या समोर असलेल्या Change Device या टॅबवर क्लिक करा. (इतर मोबाईल क्रमांकाच्या समोर असलेल्या Change Device वर क्लिक होणार नाही, याची दक्षता घ्या.)
👉 यानंतर एक मेसेज संगणकाच्या स्क्रिनवर येईल, त्याला Ok करा व अकाऊंट लॉग आऊट करा.
👉 यानंतर मोबाईलवरून MDM अॅप रजिस्ट्रेशनची प्रक्रिया पूर्ण करा.

              *शालेय पोषण आहार विभाग*

Sunday, March 10, 2019

ससा आणि कासवाच्या शर्यतीत ससा झोपून राहिल्याने हरला. कासव जिंकले पण सशाला शांत बसवेना .आपल्यात वेगाने पळण्याची क्षमता अधिक असूनही निव्वळ झोपल्यामुळे आपण हरलो हे त्याच्या लक्षात आले. पराभवाचा हा सल संपविण्यासाठी त्याने कासवापुढे पुन्हा शर्यतीचा प्रस्ताव ठेवला. विजयाच्या आनंदात आपण जिंकू शकतो, यावर विश्वास बसलेल्या कासवाने होकार भरला. शर्यत पुन्हा सुरू झाली. यावेळी सशाने चूक केली नाही. तो थांबला नाही. झोपला नाही. परिणामी, वेगवान ससा शर्यत जिंकला. हळू चालणारे कासव हरले.
    पण एकदा विजयाची चव चाखलेलं कासव हार पत्करायला तयार नव्हतं. कासव पुन्हा सशाकडे गेलं. म्हणालं,'मी तुझं ऐकलं. आता तू माझे ऐक. आपण पुन्हा शर्यत लावू !'ससा हसला आणि म्हणाला, "एकदा माझ्या चुकीमुळे हरलो. पुनःपुन्हा मी ती चूक कशी करेन ? पण तुझी हरण्याचीच इच्छा असेल तर लावू पुन्हा शर्यत !' सशाचा होकार मिळाला तसं कासव म्हणालं, 'पण यावेळी शर्यतीचा मार्ग मी ठरवणार !' स्वतःच्या वेगाची आणि कासवाच्या धिम्या गतीची खात्री असलेल्या सशाने त्यालाही होकार भरला .
    शर्यतीचा मार्ग कासवाने ठरवला. शर्यत पुन्हा सुरू झाली ससा चूक करणार नव्हता. तो वेगात पळत राहिला. कासव मागे राहिलं पण पळता पळता अचानक ससा थबकला. जागेवर थांबला. पुढे आडवी नदी वाहत होती. कासवाने बरोबर मार्ग काढला होता. सशाला पोहता येत नव्हतं. ससा तिथेच थांबुन राहिला. हळूहळू येणारं कासव तिथे पोहोचलं. त्याने सशाकडे सस्मित पाहिलं आणि नदीत उडी मारून पलीकडच्या काठावर पोहत पोहोचलही.शर्यत कासवाने जिंकली. सशाच्या वेगक्षमतेवर कासवाने स्वतःच्या बुद्धिक्षमतेने मात दिली .हरलेला ससा विचार करत राहिला. आपल्याला पोहता येत नाही, म्हणून आपण हरलो, हे त्याच्या लक्षात आलं.तो विचार करून पुन्हा कासवाकडे गेला. म्हणाला,'मित्रा, आपण आजपासून शर्यत नाही लावायची.आजपासून एक करायचं. जिथे जमीन असेल तिथे मी तुला पाठीवर घेईन. जिथे नदी आडवी येईल तिथे तू मला पाठीवर घे. दोघे मिळून आपण असे पुढे जात राहिलो, तर सर्वात पुढे आपण दोघेच असू !'
    प्रत्येकात साऱ्या गोष्टी अथवा गुण कधीच नसतात. मात्र प्रत्येकात काहींना काही गुण असतोच.जे आपल्यात नाही ते इतरांकडे असू शकते. जे इतरांकडे नाही ते आपल्याकडे असू शकतं. अशा एकमेकांच्या गुणांचा वापर करीत आपल्यातला उणेपणा भरून काढता येतो.सर्वोत्तम यश गाठता येतं.
  एकमेकांना पराभूत करण्यात शक्ती खर्ची घालण्यापेक्षा एकमेकांच्या शक्तीच्या बळावर बलाढ्य काही करता येतं. वैयक्तिक मोठेपणाच्या अभिलाषेपायी निव्वळ दुसऱ्याच्या चुका काढण्यापेक्षा, त्यांच्यातील चुकांकडे दुर्लक्ष करून त्यांच्यातील उत्तम गुण हेरून त्यांचा वापर करून घेणं, ही खरी यशस्वी क्रियाशीलता !
     उपयोगी पडणारी माणसं मिळवणं आणि आपण कोणाच्या उपयोगी पडू शकतो ते पाहून त्याला मदत करणं या सहकार्यभावनेच्या जोरावरच मोठमोठी कार्य सिद्धीस नेली जातात. काही लोकांकडे कल्पनाक्षमता असते;पण कल्पना सत्यात उत्तरावणारी कृतीक्षमता नसते.काहींकडे शक्ती असते; पण योग्य नियोजनक्षमता नसते. काहींकडे संघटनक्षमताअसते; पण निर्णयक्षमता नसते. निर्णयक्षमता असते; तर नेतृत्वक्षमता नसते. अशावेळी ज्याच्याकडे जे आहे त्याचा त्याच्या गुणांचा योग्य वापर करीत सांघिकपणे पुढे जाणे म्हणजेच बिकट रणांगणही जिंकणे!
   यश मिळवायचं असेल तर असे गुण आणि गुणी माणसं वेचणं हे फार महत्त्वाचं !संकटाच्या क्षणी गोगलगायीसारखे पोटात पाय घेऊन स्वतःच्याच कोषात लपून राहणं टाळलं पाहिजे!याउलट जास्तीत जास्त माणसं जोडा. जुन्या सौहार्दाचा शोध घ्या ! नव्याने मैत्री करा. साऱ्यांच्या संपर्कात राहा. मिळूनमिसळून वागा. तुमच्यासाठी जे जे उत्तम ते ते शोषून घेण्यासाठी तत्पर असलेले टिपकागद व्हा !

Thursday, October 11, 2018



  *स्टुडन्ट पोर्टलवर  पासबुक व आधारकार्ड अपलोड करणे.*
-----------------------------------------------------------------------------------
 *मोबाईलवरून आधारकार्ड व पासबुक student पोर्टलवर अपलोड करणे.*
*सर्व प्रथम आपल्या मोबाईलवर  Cam scanner हे ॲप डाऊनलोड करावे.*
 *विद्यार्थ्याचे आधारकार्ड व  बँकपास बुकाच्या पहिल्या पानाची प्रत  camscanner अँपच्या साह्याने स्कँन करून jpg format मध्ये सेव करावे.*
 *स्टुडन्ट  पोर्टलवर जाऊन   विद्यार्थी update tab विद्द्यार्थ्याचा नावा समोरील update tab ला click करा व मेनूबार मधील  शेवटचा bank tab ला click करा.*
*या टँबवर आपल्याला काम करायचे आहे येथे बँकेचे नाव,खाते नंबर,आय एफ.सी.कोड ,पालकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे.*
*विद्यार्थी बँक पासबुक व आधार कार्ड camscanner अँपने स्कँन करून ठेवलेले आपण येथे अपलोड करायचे आहे.*
*अपलोड झाल्यावर सेव्ह  बटनावर click करावे.अशा रितीने आपण जलद गतीने सरल पोर्टलवर मोबाईलच्या साह्याने वेगाने काम करू शकतो.*

* सकलन*


Thursday, September 13, 2018

पायाभूत चाचणी चे गुण student.maharashtra.gov.in या पोर्टलवर भरणे .*

*पायाभूत चाचणी इयत्ता 2 ते 8 वी ची झालेली असून विद्यार्थ्यांचे गुण हे प्रत्येक प्रश्नानुसार विषयनिहाय student.maharashtra.gov.in या पोर्टल वर भरावयाचे आहेत.* मुख्याध्यापक हे त्यांच्या लॉगीनवरून सदर गुण Excel Sheet ही download करून भरू शकतील अथवा वर्गशिक्षकांना Mahastudent या Android App द्वारे भरता येतील.

*खालील प्रमाणे कार्यवाही करून Excel Sheet द्वारे गुण भरता येतील.*

1)   student database ही वेबसाइट ओपन करा
 2) user name  टाका
3) password टाका
4) capcha टाका.  Enter करा.
5) आता एक windo open होईल ,
तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  Download Question Wise या Tab वर क्लिक करा .
6) आता एक फाईल  open होईल त्यात exam type - base line निवडा,
7) subject निवडा,
8) shorting मध्ये Gender किंवा  / Alphabetical घ्या.
9) Satnderd, Division निवडा.
10) Download file वर क्लिक करा. 
11)file Download मध्ये सेव होईल.
12) Download Folder मधुन
file open करा आलेल्या box ला  yes वर क्लिक करा.
13) आता समोर एक Excel file open झालेली दिसेल.
14) त्यात विद्यार्थ्यांचे गुण भरा .
15) file मध्ये कुठलाच बदल करू नका.
16) सर्व विद्यार्थ्यांचे गुण भरल्यानंतर डाव्या कोपर्‍यातील Ms  बटनावर जा file save as  option वर माऊस न्या तेथे save as type csv coma delimeted  हा  option घ्या. File name साठी मूळ एक्सेल फ़ाइल चे जसे नाव होते ते कॉपी करुन तसेच इथे  आता आपली file upload  करण्यासाठी तयार आहे.
17 ) आता minimize desktop browser परत student database ओपन करा
18) तेथुन आडवा पाचवा Excel ह्या Tab वर जा व तेथुन  upload Question wise  या Tab वर क्लिक करा . तेथे select file browser वर क्लिक करा.
19) आता आपन मार्क भरलेली परंतु  csv झालेली file निवडा .csv झालेली file ओळखण्यासाठी  त्या file मध्ये  small a  दिसेल. 
20 ) file select  केल्यानंतर  upload stap 1 वर क्लिक करा. Corser फिरु द्या
upload stap 2 व  upload stap 3 पुर्ण झाल्यानंतर Data Upload Successfully या बारवर click करा.
आता आपली file यशस्वीपणे Upload झाली.
वरिल पध्दतीनुसार गुण भरण्याची प्रक्रीया  करावी.
                                

Saturday, August 25, 2018

                             सरलमध्ये online वर्गवाटप करणे
---------------------------------------------------------
 मित्रांनो दरवर्षी आपल्या शाळांमध्ये वर्गवाटप नविन सत्रात केले जाते.तसेच सार्वत्रिक बदली यामुळे सुद्धा वर्गवाटप करावे लागते . हा बदल आपणास सरल पोर्टलला सुद्धा करावा लागतो  कारण या पोर्टलला online पायाभूत व संकलीत चाचणीचे गुण भरावयाचे असतात व विहीत मुदतीत संबंधित वर्गशिक्षकाला /विषयशिक्षकाला गुण भरता यावे व मु अ ला  शाळेतील विद्यार्थ्यांचे  गुण भरण्यास इतर शिक्षकांची मदत मिळाल्यास कार्य सुकर होईल हा यामागील हेतू.
               तर समजून घेऊ या सरलला online वर्गवाटप कसे करावे.
१) मागील सत्रात केलेले वर्गवाटप निश्चितपणे यावर्षी बदलेले असणार त्यामुळे प्रथमतः हे मागील वर्षी संबंधित शिक्षकाला दिलेले वर्ग बदलविण्यासाठी ते वर्ग निवडून Remove करावे लागेल तरच नविन वर्ग त्या शिक्षकाला देता येईल म्हणून
       student portal मधील mentainance tab ला क्लिक करा. तेथे Assign class teacher नावाची tab आहे ती ओपन करा.त्यातील ज्या वर्गात चे शिक्षक बदलवायचे आहैत, तो वर्ग निवडा व √ अशी खूण चौकटीत करुन Remove यावर क्लीक करा व ok ला क्लिक करा. याप्रमाणे कृती करुन बदल करुन घ्यावे.
२) आता Master tab ला क्लिक करा .त्यातील create teacher user मधून बदली होऊन गेलेले शिक्षक delete करा.व त्याऐवजी नविन आलेले शिक्षक add केले असतीलच.नसेल तर त्यांना add करुन घ्या.आता या नविन शिक्षकांचे hm/class teacher/teacher  व mobile number , email id टाकून Register या बटनावर क्लिक करा .हे नविन शिक्षक add होतील.
४) आता जुने व नविन शिक्षक यांना वर्ग वाटप करण्यासाठी परत mentainance या tab ला क्लिक करा. त्यात एकेक वर्ग/stream/division निवडून teacher select करावे व Assign ला क्लिक करा.
       याप्रमाणे सर्व शिक्षकांना वर्गवाटप करावे.
   --------------------------------------------------------- ---------------------------------------------------------
     

Friday, August 17, 2018

संपूर्ण ISM v6

*संकलन माहिती*

    *संपूर्ण ISM V6*

*मित्रांनो, कॉम्प्युटर वर मराठी टायपिंग कसे करावे याविषयी बऱ्याच वेळा चर्चा होते.अनेक जण अनेक पर्याय सुचवतात पण आज आपण सर्व शासकीय कार्यालयात मराठी टायपिंग करण्यासाठी जे युनिकोड सॉफ्टवेअर वापरले  जाते म्हणजेच*
*ISM V6 (Updated Version)*
*जे अतीशय सोपे आहे त्याची इत्यंभूत माहिती पाहू.*

*ISM युनिकोड टायपिंग ची वैशिष्ट्ये*

*1) इग्रजी अक्षरांवर मराठी टायपिंग होते. जे हवेत तेच शब्द टाईप होतात शब्द सिलेक्षन  करावे लागत नाहीत उदा. राम r +(shift key दाबून) a + m + a*

*2) खूप युनिकोड फॉन्ट आहेत त्यामुळे आपल्याला हवा तो युनिकोड फॉण्ट वापरून डॉक्युमेंट सुंदर बनवता येतात.ही सुविधा गुगल इनपुट मध्ये नाही.शक्य झाले तरी खूप समस्या येतात.*
*3) सर्व शासकीय कार्यालयात bellingual format वापरतात त्यामुळे ते सर्व डॉक्युमेंट आपण आपल्या संगणकावर पाहू शकतो गुगल इनपुट मध्ये ते शक्य नाही.*

*चला तर पाहूया*
*ISM V6 Unicod Software*

*Install कसे करावे?*

*1) खालील लिंक ला क्लिक करून माझ्या गुगल ड्राईव्ह वरून हे सॉफ्टवेअर डाऊनलोड करून घ्या व तुमच्या संगणकाच्या C  ड्राईव्ह सोडून इतर कुठल्याही ड्राईव्ह का कॉपी–पेस्ट करून घ्या.*

https://drive.google.com/folderview?id=11GYJDeTVUQMlWY2qFMAteJmbx0rLT2II

*2) फाईल ओपन करा व त्यातील*
*Setup............application*
*ला right click 2 वेळा करा*
*पुढील मॅसेज येईल*

*_Please close all open application before installation_*
*त्याखाली  OK बटाणाला क्लिक करा*

*3) application installation सुरू होईल वाट पाहा*

*4)आता पुढील विंडो येईल*
*_Welcome to install shield wizard for ISM V6_*
*Next बटण का क्लीक करा*

*5)आता पुढील विंडो येईल*
*_Licence Agreement_*
*Yes बटण ल क्लिक करा*

*6)आता पुढील विंडो येईल*
*_Customar Information_*

*Comany name मध्ये Home असे लिहा व next बटण ला क्लीक करा*

*7)आता पुढील विंडो येईल*

*_Choose Destination location_*

*next बटण ला क्लीक करा*
*8) आता ISM V6 चा*
*_Components_*

*विंडो येईल व ISM V6 चे installation सुरू होईल.*

*सर्व installailation प्रक्रिया पूर्ण होवून*

*_ISM V6 Installation successful_*

*हा विंडो येईल OK करा*

*9) आता README Notepad हा विंडो येईल. वर उजव्या कोपऱ्यात × (cancel) बटनावर क्लिक करा*

*10) आता Registration Form येईल. नेट चालू करून विचारलेली सर्व माहिती भरा व Submeet करा किंवा माहिती न भरता डायरेक्ट  Cancel बटण वर क्लिक करा.जे आवडेल ते करा.*

*11) आता पुढील विंडो मध्ये*
*_Installation shield wizard complete_*
*हे लिहून येईल व त्याखाली*
*๏ Yes I want to restart my computer*
*असा Yes च्या बटनावर अगोदरच टिक केलेला केलेला विंडो येईल. टिक केलेले नसेल तर ते करा व खाली असलेल्या*
*_Finish_*
*बटण का क्लिक करा*

*12)आता तुमचा कम्प्युटर Restart होईल.ISM softwar तुमच्या कॉम्प्युटर वर install झाले आहे.*

*13) तुमच्या संगणकाच्या Desktop वर ISM Software चे ' ' i ' अक्षर असलेले सिम्बॉल आलेले असेल.right double click करून तो pin to taskbar ला left double click करून तो taskbar ला घ्या.*

*14) Taskbar वर असलेल्या ISM-Symbol ला Left double Click करा. टायपिंग चे सर्व Menu ओपन होतील.*
*कर्सर Easy Phonetic Window ला नेवुन left singal click करा यामुळे आपण जसे बोलतो तीच इंग्रजी अक्षरे टाईप करून सहज मराठी टायपिंग करता येईल*
*आता कर्सर Num Lock या विंडो वर नेवून left singal click करा.यामुळे num lock की दाबल्यावर आपण इंग्रजी व मराठी टायपिंग दोन्ही एकाच वेळेस करू शकतो. Ism टायपिंग करताना Num lock on असणे आवश्यक आहे*
*15) ISM मध्ये टायपिंग करताना ISM Software चालू असणे आवश्यक आहे त्यामुळे नेहेमी ISM MENU चालू करून minimise करा व टायपिंग करा.*
*16) आता एखादी Word किंवा Excel ची फाईल ओपन करा. Font Selection मध्ये जा व*
*_DOVT Surekh_*
*_DOVT Yogesh_*
*_DOVT Ganesh_*
*व मराठी अंकासाठी*
*वरील Font पुढे MR असलेला Font निवडा*
*फॉण्ट फाईल मध्ये 100 च्या वर अशाच प्रकारचे खूप सुंदर Font आहेत तेही download करून घ्या*
*Font File Link*

https://drive.google.com/folderview?id=1CRtq7hqwunNyImSy_h4OYGJxHDPF9LDp

*सर्व फॉन्ट एकत्रित कॉपी पेस्ट कसे करावेत?*
*1) फाईल डाऊनलोड करून घ्या.*
*2) तुमचा PC मध्ये ती फाईल कॉपी पेस्ट करा*
*3) फाईल open करा*
*4) control + A दाबा[ सर्व फॉन्ट आकाशी रंगाने सिलेक्ट होतील ]*
*5) mouse ने cursor सिलेक्ट केलेल्या फॉन्ट च्या मध्ये नेवून control + C दाबा [ select केलेले सर्व फॉन्ट कॉपी होतील ]*
*6) PC च्या स्टार्ट मेनू मध्ये Font असे टाइप करुन font - file शोधा-लगेच दिसेल.*
*7) Font file open करा व ओपन झालेल्या application वर cursor ने एकदा क्लिक करून.*
*control + P दाबा म्हणणे सर्व फॉन्ट कॉपी होतील.*

🖥🖥🖥🖥🖥🖥

*17) टाईप कसे करावे ?*
*प्रत्येक इंग्रजी की वर त्याच उच्चाराची मराठी अक्षरे आहेत.त्यानुसार आपण सहज टायपिंग करू शकतो*

*Key व अक्षरे*

*A = अ*
*AA किंवा shift A = आ*
*I = इ*
*II किंवा shift I = ई*
*U = उ*
*UU किंवा shift U = ऊ*
*E = ए*
*AI = एे*
*O = ओ*
*Shift O = ऑ*
*Shift + 2 किंवा 3 + A = अॅ*
*AU = औ*
*AM =अं*
*AH = अ:*

*अपेक्षित अक्षरांना काना, मात्रा, वेलांटी, उकार देण्यासाठी त्या अक्षर पुढे दिलेली स्वर-की दाबावी*
*उदा.*
*K + A = क*
*K + AA किंवा shift A = का*
*K + I = कि*
*K + II किंवा shift I = की*
*K + U = कु*
*K + UU किंवा shift U = कू*
*K + E = के*
*K + A + I = कै*
*K + O = को*
*K + A + U = कौ*
*K + Shift + 2 किंवा 3  = कॅ*
*K + Shift O = कॉ*
*K + shift + M = कं*
*K + H = कः*
*KA = क*
*KH = ख*
*GA = ग*
*GHA = घ*
*CA = च*
*CH किंवा shift + CA = छ*
*JA = ज*
*JHA किंवा ZA = झ*
*shift + TA =  ट*
*shift + T + HA = ठ*
*shift + DA = ड*
*shift + D + HA = ढ*
*shift + N = ण*
*TA = त*
*THA = थ*
*DA = द*
*DHA = ध*
*NA = न*
*PA - प*
*PHA किंवा shift + P +A =  फ*
*BA = ब*
*BHA किंवा B + shift + A = भ*
*MA = म*
*YA = य*
*RA = र*
*LA = ल*
*VA किंवा WA =  व*
*SHA = श*
*shift +S+A = ष*
*SA = स*
*HA - ह*
*shift + L = ळ*

*_यापुढील नंबर 'की' या मुख्य कीबोर्ड वरील आहेत_*

*KSH किंवा shift + 7 + A = क्ष*

*DNYA किंवा shift + 5 + A =  ज्ञ*

*TRA किंवा shift + 6 + A = त्र*

*SHRA किंवा shift + 8 + A = श्र*

*shift + [+] =  ऋ*

*अक्षर + Shift + [+] = ृ (उदा. P + shift + [+] = पृ*

*अक्षर + shift + M = अनुस्वार ं [उदा. P + shift + M = पं ]*

*अक्षर + shift + X = अर्धे अक्षर [उदा. P + shift + X =  प् ]*

*R + अक्षर + A = रफार [उदा. R + P + A = र्प ]*

*अर्धा 'र' __'य' ला जोडताना  वजाबाकी चे चिन्ह वापरावे*
*इतर अक्षरांना जोडताना*
*अक्षर + R + A =' र' चा जोडशब्द तयार होतो*
*उदा.*
*P + R + A = प्र*

*याच माहितीची pdf फाईल मिळवण्यासाठी खालील लिंक का क्लिक करून डाऊनलोड करा.*

https://drive.google.com/folderview?id=1e8S8zVxKETNKn0aNFU3bpI6bwVyrbnWo

*प्रवीण वाव्हळे सर*
*सावित्रीबाई फुले प्राथमिक शाळा*
*उल्हासनगर*
*जिल्हा - ठाणे*
*92-7070-3535*
*98-33-11-77-44*
        * संकलन*

Thursday, August 16, 2018

युटयुबवर लिंक अपलोड करणे

**स्वतःचे वीडियो you tube वर अपलोड करुन link कशी तयार करावी**

*आपले ई मेल अंकाऊट साइन असावे*

1)वेब ब्राऊजर मध्ये youtube.com सर्च करावे.

2)you tube ओपन झाल्यावर मोबाइलमध्ये - उजव्या कोपर्यात वर video  search याचे चिन्ह दिसेल.

3)video चिन्हावर click करुन त्यातून आपल्या मोबाइल मधील upload करणाऱ्या video निवडावे

     

4)Title मध्ये तुमच्या video चे नाव लिहा।व public करुन उजव्या कोप-यातील बाणावर click करावे.

5)video upload होई पर्यंत थांबावे.

6) upload video च्या उजव्या बाजूला 3 ठिबला क्लिक करुन share वर क्लिक करावे.

7)आपल्या you tube ची तयार झालेली लिंक दुसऱ्याना पाठवावी.

8)तुमचे नाव व फोटो दिसत नसेल तर अपलोड करा.