Sunday, July 22, 2018
Sunday, June 3, 2018
आपले सरकार पोर्टल वर तक्रार
*आपले सरकार*
*बदली मध्ये अन्याय झाल्यामुळे आपण आपल्या प्रशासनाला अर्ज तर केलेतच परंतु आपले सरकार या वेबसाईट वर सुद्धा तक्रार दाखल करावी . जेवढ्याना जमतय त्यानी तरी करावेत हि विनंती .*
आपले सरकार वर तक्रार दाखल करण्याची पद्धती खालील प्रमाणे आहे .
आगोदर ही सर्व पद्धती समजुन घ्या एक मिनिटामध्ये समजते .नंतर
खालील वेबसाइट ला टच करा व तक्रार दाखल करा .
https://grievances.maharashtra.gov.in
👇
या लिंकला टच करा
👇
उजव्या कोपर्यामध्ये *मराठी* भाषा निवडा
👇
*तक्रार दाखल करा* या टॅबला टच करा .
👇
आपला मोबाईल नंबर आणि इमेल आयडी टाका
👇
सत्यापित ला टच करा
👇
आपण टाकलेल्या मोबाइल नंबरवर सहा अंकी ओटीपी आला आहे तो टाका
👇
सत्यापित टॅब ला टच करा
👇
प्रशासन स्तर *मंत्रालय* निवडा
👇
जिल्हा निवडा
👇
तालुका निवडा
👇
विभाग निवडा
👇
ग्रामविकास विभाग
👇
त्यानंतर आपली बदकी विषयी जी काही तक्रार आहे ती त्या अर्जामध्ये टाइप करा .
लक्षात घ्या जे मुख्य तक्रार आहे तोच विषय टाका आणि आपल्यावर नेमका अन्याय कसा झाला आहे ते लिहा .
त्यामध्ये आपले पुर्ण नाव , शाळा , युडायस नंबर , स्टाफ आय डी , मोबाईल नंबर या बाबींचा उलेख आवश्य करा .
👇
Preview या टॅबला टच करा
👇
Conform & Save ला टच करा .
👇
आपली तक्रार दाखल झाली आहे आता आपल्या मोबाईलवर ताबडतोब त्याच वेबसाईट वर लगेच आपली तक्रार दाखल झाल्याचे दिसेल आणि आपणास तक्रार नंबर दिसेल तो जतन करुन ठेवावा . त्यावरुन आपणास आपल्या तक्रारीची सद्यस्थिती पाहता येइल .
* संकलन*
Saturday, May 26, 2018
Wednesday, April 11, 2018
MDM मागील दिवसाची माहिती भरणे
*@ MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती कशी भरावी? @*
*MDM मधील मागील दररोज भरायची माहिती राहिली असल्यास ती आता आपल्याला 10 एप्रिल 2018 ते 11 एप्रिल 2018 पर्यंत भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.*
*User ID - 2713120012
*Password - Kpkhadsangi@12
*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇
*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*
https://education.maharashtra.gov.in/mdm
⬇
*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
*MDM Daily INFO वर क्लिक करा.*
⬇
*आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो महिना व तारीख कॅलेंडर मधून निवडा*.
⬇
*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*
⬇
*उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*
⬇
*आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*
⬇
*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*
⬇
*Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*
*माहिती भरा व वरील कोपर्यात Update शब्दावर क्लिक करा.*
⬇
*माहिती Successfully असा मेसेज येईल.*
*अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*
*ता. क. MDM बील आता अॉनलाईन केले जात आहे. आपले मागील पूर्ण बील मिळण्यासाठी राहिलेल्या दिवसाची माहिती भरून घ्या.*
Wednesday, February 28, 2018
MDM -मागील माहिती भरणे
*MDM मागील माहिती कशी भराल?* * MDM वेबसाईटवर केंद्रप्रमुखांचा युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगिन करा.* * MDM Daily Info वर क्लिक करा.* * MDM Attendance Date वर क्लिक करा. कॅलेंडर मधून आपल्याला ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या तारखेवर क्लिक करा.* * पुढे Pending शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* *त्याच रांगेत Result शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता खाली आपल्या केंद्राचे नाव दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची नावे दिसतील. आपल्या शाळेची माहिती चेक करा. त्यामध्ये सर्व माहिती Blank दिसेल व शेवटी Add शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* * आता माहिती भरण्यासाठी Page Open झाले आहे. त्यामध्ये माहिती भरा. माहिती भरून झाल्यावर वरच्या बाजूला उजव्या कोपर्यात Update शब्द दिसेल त्यावर क्लिक करा.* *Data Saved Successfully असा वर मेसेज दिसतो. त्याठिकाणी OK शब्दावर क्लिक करा.* * पुढच्या दिवसाची माहिती भरण्यासाठी वरील कृती पुन्हा करा.* *धन्यवाद.
Sunday, January 28, 2018
I inspired
*जर जंगलाचा विचार केला तर...*
1) कोणता प्राणी सगळ्यात मोठा आहे?
उत्तर - हत्ती
2) कोणता प्राणी सगळ्यात उंच आहे?
उत्तर - जिराफ
3) कोणता प्राणी सगळ्यात चपळ आहे?
उत्तर - कोल्हा
4) कोणता प्राणी सगळ्यात वेगवान आहे?
उत्तर - चित्ता
*असं असलं तरी सिंह जंगलाचा राजा आहे. वरीलपैकी एकही क्वालिटी नसताना सिंह जंगलाचा राजा आहे हे विशेष. असं का बरं?*
*सिंह धैर्यवान आहे. तो कोणतीही गोष्ट आत्मविश्वासाने करतो. तो कशाचीही भीती बाळगत नाही, कधी घाबरत नाही. कोणत्याही परिस्थितीत सिंहाला कोणीही थांबवू शकत नाही. सगळ्यात जास्त जोखीम घेणारा सिंह आहे. सिंहाला विश्वास आहे की, कोणताही प्राणी त्याच्यासाठी अन्न होवू शकतो. सिंह कोणतीही संधी सहजा-सहजी सोडत नाही. तो शेवटपर्यंत प्रयत्न करत असतो. वरील गोष्टींचा विचार केला तर आपण सिंहाकडून काय शिकू शकतो.*
*आपण वेगवान नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात हुशार नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण सगळ्यात स्मार्ट नसलो तरी काही फरक पडत नाही. आपण बुद्धिवान नसलो तरी काही फरक पडत नाही.*
*मग गरज कशाची आहे? तर तुमच्याकडे धैर्य असले पाहिजे. तुमच्याकडे प्रयत्न करण्याची प्रबळ इच्छाशक्ती असली पाहिजे. तुमचा तुमच्या प्रयत्नांवर विश्वास असाला हवा. मी हे करू शकतो, हा तीव्र विश्वास तुमच्याकडे असला पाहिजे. महत्वाचं म्हणजे आपल्या प्रत्येकाच्या आत एक सिंह दडलाय. त्याला बाहेर काढण्याची गरज आहे. अंतप्रेरणेने कामाला लागा, स्वतःवर, स्वतःच्या प्रयत्नांवर विश्वास ठेवा. तुमच्या प्रत्येक कृतीचा आनंद घ्या, तुम्हाला हवं ते तुम्ही नक्कीच प्राप्त करू शकता.*


