Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Wednesday, April 11, 2018

MDM मागील दिवसाची माहिती भरणे

*@ MDM मधील मागील राहिलेल्या दिवसाची माहिती कशी भरावी? @*

   *MDM मधील मागील दररोज भरायची माहिती राहिली असल्यास ती आता आपल्याला 10 एप्रिल 2018 ते 11 एप्रिल 2018 पर्यंत भरण्यासाठी सुविधा उपलब्ध झाली आहे. आपल्या केंद्रातील ज्या शाळेची शापोआ शिजवल्याची मागील माहिती भरायची राहिली आहे. त्या शाळांनी केंद्रप्रमुख लॉगिन वापरून आपल्या शाळेची मागील माहिती भरायची आहे. त्यासाठी खालील युजर आयडी आणि पासवर्ड वापरून आजच्या आजच ही माहिती भरावी. हयगय करू नये.*

*User ID -      2713120012
*Password - Kpkhadsangi@12

*MDM मागील माहिती भरण्यासाठी स्टेप्स खालीलप्रमाणे* ⬇

*खालील वेबसाइट वर जाऊन केंद्रप्रमुख युजर आयडी व पासवर्ड ने लॉगिन करा.*

   https://education.maharashtra.gov.in/mdm

*त्यानंतर जी स्क्रीन ओपन होईल. त्यामधील वरच्या आडव्या पट्टीवरील -*
   *MDM Daily INFO वर क्लिक करा.*

  *आता तुम्हाला मागील ज्या तारखेची माहिती भरायची आहे किंवा भरलेली आहे की नाही याची खात्री करायची आहे तो महिना व तारीख कॅलेंडर मधून निवडा*.

*जर मागील माहिती भरायची असेल तर Total, Info received आणि pending या तीन पैकी Pending शब्द निवडा.*

*उजव्या बाजूला Result बटन दिसते त्यावर क्लिक करा.*

  *आता खाली cluster name मधील तुमच्या केंद्राचे नाव दिसेल त्या नावावर क्लिक करा.*

*आता आपल्या केंद्रातील सर्व शाळांची यादी दिसेल. यामध्ये आपली शाळा शोधा.त्यामध्ये तुमच्या शाळेची माहिती भरलेली नसेल तर सर्व कॉलम blank दिसतील. व सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये Add दिसेल.*

   *Add वर क्लिक केले की तुमच्या शाळेची त्या तारखेची माहिती भरण्यासाठी स्क्रीन येईल.*

  *माहिती भरा व वरील कोपर्‍यात Update शब्दावर क्लिक करा.*

*माहिती Successfully असा मेसेज येईल.*

     *अशी कृती ज्या ज्या दिवसाची माहिती भरायची आहे त्या त्या वेळी MDM daily info वर क्लिक करायचे आहे.लक्षात ठेवा की प्रत्येक दिवसाची माहिती भरण्यासाठी ही कृती स्वतंत्रपणे करायची आहे.*
   
    
       
               
                  
*टिप - लक्षात ठेवा की केंद्रप्रमुख लॉगिन वरून फक्त मागील राहिलेल्या दिवसाची माहिती भरता येते. कोणत्याही प्रकारची दुरुस्ती मात्र करता येत नाही*

*ता. क. MDM बील आता अॉनलाईन केले जात आहे. आपले मागील पूर्ण बील मिळण्यासाठी राहिलेल्या दिवसाची माहिती भरून घ्या.*

No comments:

Post a Comment