Search This Blog

शिक्षण परीषद

शिक्षण परीषद


Powered By Blogger

Tuesday, October 3, 2017

संच मान्यता

*♦30 सप्टेंबर -शिक्षक संचमान्यता निकष ♦*

       सर्व शिक्षक बांधवांना माहीतीस्तव कळविण्यास येते की,सध्या  अस्तित्वात असलेल्या  आपल्या शाळांमध्ये शिक्षक संचमान्यता शासनाच्या *28 ऑगस्ट 2015* च्या जी.आर.नुसार पुढीलप्रमाणे आहे.तरी आपल्या शाळेतील पद कमी होणार नाही किंवा कसे वाढवता येईल या दृष्टीने प्रयत्न करावेत ही विनंती.
*🔸प्राथमिक शाळा -1ते4/1ते5 साठी निकष 🔸*
1)सर्व विद्यार्थी *मिळुन 60 पर्यंत -2 शिक्षक.*
2)60 पेक्षा जास्त विद्यार्थी असल्यास *प्रत्येक 30 विद्यार्थ्यांमागे 1 शिक्षक.*
3)1ते4 किंवा 1ते5 मध्ये *वर्ग 3 किंवा 4 किंवा 5 मध्ये 20 विद्यार्थी* असतील तर अतिरिक्त 1 शिक्षक.
4) *मुख्याध्यापक मान्य पदासाठी*
1ते4 किंवा 1ते 5 ची पटसंख्या 136 असावी.
*🔸उच्च प्राथमिक शाळा :-5ते7 किंवा 6ते8 साठी निकष 🔸*
1)तिनही वर्ग मिळुन *36 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक* (1गणित/विज्ञान, 1भाषा,1सामाजिक शास्त्र)
2)विद्यार्थी संख्या *105 पेक्षा जास्त असल्यास 35 च्या* पटीने 1 अतिरिक्त शिक्षक
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी संख्या आवश्यक
*🔸माध्यमिक शाळा -9वी ते 10 वी साठी निकष 🔸*
1) 9 वी 10 वी चे विद्यार्थी मिळुन *40 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 3 शिक्षक*(1भाषा,1गणित/विज्ञान, 1सामाजिक शास्त्र )
2)9 वी किंवा 10 वी कोणत्याही एका वर्गामध्ये 60 पेक्षा अधिक विद्यार्थी असल्यास 1 अतिरिक्त शिक्षक.
3) *मुख्याध्यापक* पदासाठी 91 विद्यार्थी असावेत.
*🔸संयुक्त शाळा -1ते7/1ते8/1ते10 असल्यास-मु.अ. पदासाठी निकष 🔸*
1) *101 विद्यार्थी संख्येस मुख्याध्यापक पद मान्य.*
टिप:-1)नवीन शाळा किंवा नवीन वर्ग ओपन करायचे असतील तर वेगळे निकष आहेत.
2)वरील निकष हे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांच्या संचमान्यतेचे निकष आहेत.
*3)जर शाळा 1ते7 किंवा 1ते8 किंवा 1ते10 किंवा 5ते 8 किंवा 8 ते10 असेल तर त्या  शाळेत फक्त 1 च मुख्याध्यापक पद मान्य असेल.*
4) 5 ते7 किंवा 6 ते 8 या वर्गांसाठी *प्राथमिक पदवीधर शिक्षकाचे* पहिले पद गणित/ विज्ञान, दुसरे पद भाषा व तिसरे पद सामाजिक शास्त्र या विषयाचे जी.आर.नुसार.

Thursday, September 14, 2017

व्ही डी ओ काँफरन्स व्दारे मिटींग अरेंज करणे

*आता वारंवार केंद्रशाळेत मीटिंगला न जाता व्हिडीओ कॉन्फरन्स द्वारे मिटिंग अरेंज करून वेळ वाचवा*

*गुरुजनहो*

*आपला बराच वेळ हा केंद्रशाळेत मीटिंग मध्येच जातो , एका आठवड्याला कमीत कमी दोन वेळा आपल्याला केंद्र शाळेत केंद्रप्रमुखांबरोबर मीटिंग ला जावे लागते*

*आज बहुतेक शिक्षकांजवळ स्मार्ट फोन आहेत , आपल्या शाळेत wifi सुविधा आल्या आहेत*

*मी तुम्हाला अशा app चा वापर करून सहज केंद्र प्रमुख आपल्या केंद्रातील सर्व मुख्याध्यापकांची सहविचार सभा एकाच वेळी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे घेतील , ज्या द्वारे वेळ व पैसा नक्कीच वाचेल*

*आपला स्मार्ट फोन wifi शी जोडला असावा किंवा 3 g G किंवा 4 G नेटपॅक असावा , सोबत हेडफोन असावा*


*त्यासाठी आपल्याला वापरायचा आहे zoom app जो खालील लिंक वर क्लिक करून किंवा गुगल प्ले स्टोर वरून  डाऊनलोड  करून घ्या*

https://play.google.com/store/apps/details?id=us.zoom.videomeetings


*हा app डाऊनलोड केल्यानंतर sign up करा , त्यात योग्य माहिती भरा व वर next करा आपल्या इमेल आयडी वर कन्फर्म लिंक येईल ती confirm करा व येते आपला पासवर्ड तयार करून continue वर क्लिक करा*


*आता आपल्या mobile मध्ये इमेल आयडी व पासवर्ड टाकून sign in करा*


*Host Meeting वर क्लिक करा नंतर  Use Personal Meeting Id सुरु करा , तेथे दहा अंकी ID नंबर येईल तो सर्व मुख्याध्यापकांना द्या ( हा PMI सर्वांना उपलब्ध होईल जो app मध्ये sign in करतील , जो मीटिंग सुरु करणार आहे त्यांनी दुसऱ्याला द्यायची आहे)*


*आता start meeting वर क्लिक करायचा आहे*

*सर्व मुख्याध्यापक zoom app सुरु करतील त्यातील पहिला पर्याय Join a Meeting वर क्लिक करतील , केंद्रप्रमुखांनी दिलेला ID टाईप करून मीटिंग start करतील*


*सर्वांनी मोबाईल चे हेडफोन कानाला लावतील , सुरुवातील एकच बोलणारा स्क्रीन वर दिसेल नंतर बोटाने स्क्रीन आडवी स्क्रोल करा सर्व एका वेळी दिसतील व सर्वांचे बोलणे स्पष्ट ऐकू येईल*

*वरील app वापरण्यास खूप सोपा आहे , खूप चांगली voice आणि video clearity आहे*

*जर केंद्रप्रमुखांना एकाच वेळी केंद्रातील सर्व शिक्षकांना संबोधित करायचे असे तर खाली लिंक वर क्लिक करून zoom आपल्या pc वर इंस्टाल करा , pc वर start मीटिंग वर क्लिक करून केंद्राप्रमुखांचा ID type करा व मीटिंग start करा , स्पीकर असल्यास सर्व जण ऐकू शकतील*

*जर माईक व वेबकॅम असेल तर सर्व शिक्षक मीटिंग मध्ये एका वेळी सहभागी होतील*


https://download.freedownloadmanager.org/Windows-PC/Zoom-Meetings/FREE-4.0.38982.714.html

*फक्त 9.4 MB चा अप्लिकेशन आहे*

*एका वेळी आपल्या शाळेतील अनेक वर्गात अध्यापन करणे*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

*या अप्लिकेशन ने सहज शक्य आहे जर आपल्या शाळेतील वर्गात मोठ्या स्क्रीन चे संगणक असतील आणि नेट जोडणी असेल तर सर्व संगणकात वरील zoom अप्लिकेशन डाऊनलोड करून zoom सुरु करा*

*जो अध्यापन करणार आहे त्याने आपला ID सर्वांना देवून सर्व वर्गात एका वेळी अध्यापन सुरु करता येईल*

*संकलन*
    *सरल फ्रेंड्स ग्रुप (राज्यस्तर)* –

Wednesday, September 13, 2017

Thursday, August 24, 2017

Educhat मोबाईलद्वारे

*मोबाईलद्वारे  sms ने विद्यार्थी/पालकांच्या मोबाइलवर गृहपाठ,  शाळेतील कार्यक्रम किंवा सभेच्या सूचना, शाळेतील गैरहजर विद्यार्थी माहिती कशा पाठवाव्यात ह्याबाबत माहिती देणारा सखोल विडिओ*
खालील लिंक वर जाऊन आवश्य पहा...👇

https://youtu.be/8MYsSTiLJSY

लिपीकार मराठी अँप

मराठीमध्ये टायपिंग करताना वेळ लागत असेल.त्यामुळे त्यांना त्यांचे विचार नीट मांडता येत नसतील..मी आता जे टाइप करत आहे ते टाईप न करता मी बोलत गेलो आहे आणि ते आपोआप टाईप होत गेले आहे.. प्ले स्टोअर वर लिपिकार मराठी नावाचे अेॅप आहे ज्याद्वारे आपण बोलून टायपिंग करू शकता...lipikar marathi app
यासाठी  मोबाइलच्या प्ले स्टोरमध्ये जावे. Lipikaar marathi keyboard असे टाइप करावे, व अॅप्लिकेशन इन्स्टॉल करावे. अॅप्लिकेशन यशस्वीरित्या इन्स्टॉल झाल्यावर, व्हॉट्सअॅपच्या की बोर्डवर जाऊन केशरी रंगाचे माइकचे चिन्ह दाबून बोलावे.

संकलन