Freeze pane चा वापर करा.
🅰🆚
मित्रहो सध्या आपण पायाभूत व संकलित 1 चाचण्याचे गुण भरत आहात.
Excel sheet मध्ये गुण भरताना आपण जसजसे उजवीकडे scroll करतो तेव्हा डावीकडे असलेली विद्यार्थ्यांची नावे दिसत नाहीत. तसेच खाली scroll केल्यावर वरच्या column ची नावे दिसत नाहीत.
या समस्येवर एक साधा उपाय आहे. विद्यार्थी नावे असलेला column freeze करणे. व वरील Title असलेले दोन row freeze करणे.
यासाठी प्रथम जो column freeze करावयाचा आहे त्याच्या शेजारचा column किंवा row select करा.
त्यानंतर Menu bar मधील
⬇
View
⬇
Freeze pane
वर click करा.
आता तुम्ही पुढे पुढे scroll करत गेलेत तरी विद्यार्थ्यांची नावे व column ची titles त्यामुळे दिसतील आपण नेमके त्याच विद्यार्थ्यांचे गुण भरू शकतो. आपला वेळ वाचेल.
Share to all.
No comments:
Post a Comment